हावडा- पश्चिम बंगालमधील हावडा जवळ झालेल्या रेल्वे अपघातात सिकंदराबाद-शालिमार एक्स्प्रेसचे ३ डबे रुळावरून घसरल्याने अपघात झाला . सुदैवाने यात कोणीही जखमी वा मृत झालेले नाही.रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेपाच वाजता कोलकात्यापासून ४० किमी अंतरावर असलेल्या नालपूर स्थानकाजवळ हा अपघात झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, २२८५० सिकंदराबाद शालीमार एक्सप्रेस आठवड्यातून एकदा धावते. आज पहाटे खरगपूर विभागातील नालपूर स्थानकावरून ट्रेन जात असताना डबे रुळावरून घसरले. यातील एक डबा पार्सल व्हॅनचा तर इतर दोन प्रवासी डबे होते .
