हिंगोली :सध्या राज्यात अवकाळी पावसाने शेतकरी हैराण झाला आहे. जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जमिनदोस्त झाली आहेत. कुठे ज्वारी, गहू, हरभरा तर कुठे द्राक्ष, आंबा, केळी या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. सोलापूर, नांदेड, जळगाव, नाशिक तसेच हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.
हिंगोली वसमत औंढा नागनाथ सेनगाव कळमनुरी अशा जिल्ह्यातील सर्व भागांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली.हिंगोली वसमत औंढा नागनाथ सेनगाव कळमनुरी अशा जिल्ह्यातील सर्व भागांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. यामुळं शेतातील गहू, ज्वारी, हरभरा, टरबूज, खरबूज या पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील संत्र्याच्या बागांना गारपिटीने झोडपले आहे. त्यामुळे झाडाला असलेली सर्व संत्रा तुटून पडली आहेत. यामुळे शेतातील गहू, ज्वारी, हरभरा, टरबूज, खरबूज या पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हिंगोली जिल्ह्यातील संत्र्याच्या बागांना गारपिटीनं झोडपलं आहे. त्यामुळं झाडाला असलेली सर्व संत्रा तुटून पडली आहेत. बागेमध्ये सर्व संत्र्याचा सडा पडल्याचे चित्र दिसून येत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील मालवंडी येथील शेतकरी जनार्दन थोरात या शेतकर्याची द्राक्ष बाग कोसळून सुमारे १५ लाखांचे नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात केळीसह काढणीला आलेल्या गहू, हरभरा, मका आणि ज्वारीच्या पिकांचं नुकसान झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नाशिक जिल्ह्यातही कांद्यासह द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. निफाड तालुक्यातील काही गावांना पंधरा मिनिटे गारपीट झाल्याने कांदा, द्राक्षबागा संकटात सापडल्या, तर येवला, नांदगाव, देवळा तालुक्यात कांद्यासह मका, गहू, डाळिंबाचे प्रचंड नुकसान झाले आहे. गारपिटीचा फटका कांद्याच्या पातीवरच बसल्याने वाढ खुंटण्याची भीती व्यक्त होत आहे. नंदुरबार जिल्ह्यात मिरचीला फटका बसला आहे. परभणी जिल्ह्यातही ज्वारी आणि गव्हाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
दरम्यान, राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे म्हणत, झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस लवकरच निर्णय घेतील असेही कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.