हिंद महासागरातील कोबाल्ट पर्वतासाठी भारत , चीन , श्रीलंकेची रस्सीखेच

नवी दिल्ली – हिंद महासागराच्या मध्यभागी सापडलेल्या कोबाल्ट पर्वतावर खाणकाम करण्याबाबत भारताने दिलेला प्रस्ताव आंतरराष्ट्रीय समुद्रतळ प्राधिकरणाने (आयएसए) फेटाळला आहे. भारताच्या दक्षिणेकडील टोकापासून १ हजार ३५० किलोमीटर अंतरावर हिंद महासागरामध्ये हा पर्वत सापडला आहे.भारत आणि श्रीलंका या पर्वतावर दावा सांगत आहेत.
हा पर्वत भारतापेक्षा श्रीलंकेच्या जवळ आहे. कोबाल्टचा हा पर्वत भारताला मिळाल्यास देशाच्या ऊर्जेच्या गरजांसाठी चीनवर अवलंबून राहणे कमी होणार आहे.कोबाल्टचा वापर इलेक्ट्रिक बॅटरीमध्ये केला जातो. कोबाल्टमुळे प्रदूषण कमी होते आणि ते अधिक टिकाऊ असते.
कोबाल्टचा विपुल साठा श्रीलंकेला मिळाल्यास श्रीलंकेच्या माध्यमातून चीन या पर्वतावर वर्चस्व प्रस्थापित करू शकेल अशी चिंता भारताला आहे. त्यामुळे या वर्षी जानेवारीमध्ये भारताने आयएसएकडे या पर्वतावर खाणकामासाठी परवानगी मागितली होती. त्यासाठी चार कोटी रुपयांहून अधिक शुल्क भरण्याची तयारीही दर्शवली. मात्र, आयएसएने भारताचा हा प्रस्ताव नाकारला.
नियमांनुसार, कोणत्याही देशाला समुद्रात काही संशोधन करायचे असल्यास आयएसएची परवानगी घ्यावी लागते. विशेषत: जेव्हा ते क्षेत्र कोणत्याही देशाच्या अंतर्गत येत नाही. जर आयएसएने भारताला खाणकामाची परवानगी दिली असती तर तिथे पंधरा वर्षे संशोधन करण्याची भारताची योजना होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top