होळीनिमित्त मध्य रेल्वेकडून कोकणवासियांसाठी विशेष ट्रेन

मुंबई:- होळीनिमित्ताने गावी जाणाऱ्या कोकणवासियांसाठी मध्ये रेल्वेकडून होळी स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहे. होळी सणादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पनवेल आणि सावंतवाडी रोड, रत्नागिरी दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालवणार आहे. गावी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने 12 स्पेशल ट्रेन चालवण्याचे नियोजन केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – रत्नागिरी विशेष तीन विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. पनवेल – रत्नागिरी विशेष चार विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. पनवेल – सावंतवाडी रोड चार विशेष गाड्या सोडल्या जाणार आहे. रत्नागिरी- लोकमान्य टिळक टर्मिनस वन वे विशेष गाडी रत्नागिरी येथून 9.3.2023 रोजी 06.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 13.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. ही एक्स्प्रेस संगमेश्वर रोड, अरावली रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबणार आहे.

या सर्व विशेष एक्स्प्रेसमध्ये 18 शयनयान, 2 सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन असणार आहेत. या विशेष गाडीच्या आरक्षण सुरू आहे. सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर या विशेष गाड्यांचे बुकिंग सुरू आहे. अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करावे असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

Scroll to Top