बंगळुरू – कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बीपीएल धारकांना रेशनवर मोफत धान्य देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार राज्यात काँग्रेसची सत्ता येताच दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करायला सरकारने सुरुवात केली आहे . त्यानुसार ११ जूनपासून राज्य परिवहन मंडळांच्या बसेस मधून महिलांना मोफत प्रवासाची मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर बीपीएल कार्डधारकांना रेशनवर १० किलो मोफत धान्य देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
कर्नाटकात काँग्रेसचे बहुमताचे सरकार सतेवर आले आहे. या सरकारने आता जनहिताच्या अनेक योजना राबवायला सुरुवात केली आहे . त्यानुसार २०० युनिट पर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता महिलांना ११ जूनपासून मोफत प्रवास आणि बीपीएल धारकांना १ जुलै पासून १० किलो मोफत धान्य दिलेजाईल तसेच गृह लक्ष्मी योजने अंतर्गत कुटुंबप्रमुख महिलेला प्रतिमाह २ हजार रुपये दिले जाणार आहेत १५ ऑगस्ट पासून या योजनेची अमलबाजी केली जाईल
१ जुलै पासून कर्नाटक मध्येरेशनवर मिळणार मोफत धान्य
