मुंबई – दोन हजारांची नोटा चलनातून बाद करण्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी आज भाजप सरकारवर हल्लाबोल केला. २,००० रुपयांची नोट रद्द केल्याने भारतीय चलनाच्या अखंडतेवर आणि स्थैर्याबाबत संशय निर्माण झाला आहे. हा निर्णय मुर्खपणाचा असल्याचे आवाहन चिदंबरम यांनी सांगितले.
पी. चिदंबरम यांनी आज मुंबईत टिळक भवनात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पी. चिदंबरम यांनी सांगितले की, भाजप सरकारमुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. या सरकारला सत्तेवरून हटवण्यासाठी देशांतील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकत्र यायला हवे. सर्वजण एकत्र आले तर भाजपाला आपण पराभूत करू शकतो. मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार निर्माण झाला आहे. त्यात ७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प आहेत. ते काहीच बोलत नाहीत.