परभणी – जिल्ह्यातील प्रसिद्ध हवामान अभ्यासक यांनी आतापर्यंत वर्तविलेले अनेक अंदाज तंतोतंत खरे ठरले आहेत. सध्याच्या अवकाळी आणि गारपीट पावसाचा अंदाजही त्यांनी वर्तविला होता.आता त्यांच्या ताज्या अंदाजानुसार उद्या २० मार्चपासून विदर्भ आणि मराठवाड्यात ऊन तापणार असून उन्हाचा पारा चढत जाणार आहे. तर काही भागात ढगाळ आणि कोरडे हवामान दिसून येईल. उत्तर महाराष्ट्रात उद्यापासून २५ मार्चपर्यंत अंशतः ढगाळ वातावरण राहणार असल्याने सूर्यदर्शन मिळणे मुश्कील होईल.तसेच नंदुरबार, जळगाव,धुळे, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यात पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता असल्याचे पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे.पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र याठिकाणीही ढगाळ वातावरण राहून तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.२५ आणि २६ मार्चला नंदुरबार,लातूर,बीड,जालना आणि परभणी जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील.
२० मार्चपासून उन्हाचा पारा चढणार