२२६८ किलोची किलर व्हेल प्रशांत महासागरात सोडणार

फ्लोरिडा : लोलिता म्हणजे किलर व्हेल आहे. याला १९७० मध्ये सिएटलच्या जवळ पकडले होते. हा व्हेल तेव्हापासून आजपर्यंत कैद होता. लोलिता जगातली सगळ्यात जूनी किलर व्हेल आहे. जी मत्सालयात सादरीकरणासाठी ठेवण्यात आली आहे. लोलिताला फ्लोरिडाच्या सी एक्वेरियममध्ये ठेवले होते. तिचे वजन २२६८ किलोग्राम आहे. आता लवकरच लोलिताला मोकळ्या समुद्रात सोडण्यात येणार आहे. लोलिताचे वय ५७ वर्ष आहे. आता तिचे एक्वेरियममधून पुढच्या दोन वर्षात तिला प्रशांत महासागरात सोडण्यात येणार आहे.

लोलिताला मोकळ्या समुद्रात सोडण्यासाठी अमेरिकी सरकारची परवानगी घेतली जात असल्याचे मियामी-डेड काउंटी मेयर डेनिएला लेवीन कावाने सांगितले.
लोलिता आता ज्या एक्वेरियममध्ये आहे त्याचा मालक यानी सीवर्ल्ड एंटरटेनमेंट ने २०१६ मध्ये किलर व्हेल्सवर परफॉर्मंस करणे बंद केले होते. एकेकाळी लोलिता एक्वेरियमची सर्वात आवडता जीव होता. तिला २०२२ मार्चला शो मधून रिटायर करण्यात आले. फीश नावाची डॉक्युमेंट्री प्रसिद्ध झाली होती. या डॉक्युमेंट्रीमध्ये ओर्का किलर व्हेल्स ला कैद ठेवण्यावर विरोध झाला. त्यांचे तोटे सांगण्यात आले होते. प्राण्याचे स्वातंत्र्य आणि अधिकारासाठी काम करणाऱ्या संस्थांना लोलिताला स्वतंत्र करण्यासाठी २०१५ पासून कोर्टात केस चालवत होते. त्यांनतर आता किलर व्हेल्स फार सामाजिक जीव असतो. तो समुद्रात कोणताही जीव यांची शिकार करत नाही. म्हणूनच हे आरामात ८० वर्ष जगू शकतात. यावर अभ्यास केल्यानांतरच आता लवकरच लोलिताला मोकळ्या समुद्रात सोडण्यात येणार आहे

Scroll to Top