८० वर्षांनी महिलेला मिळाला आपल्या हक्काच्या घराचा ताबा

मुंबई : मुंबईतील एका महिलेला आपल्या हक्काचे दोन फ्लॅट तब्बल ८० वर्षांनी परत मिळाले. अ‍ॅलिस डिसूझा असे या महिलेचे नाव असून ५०० चौरस फुट आणि ६०० चौरस फुट क्षेत्रफळांचे हे फ्लॅट आहेत. १९४२ मध्ये ताबा दुसऱ्याकडे गेलेला फ्लॅट या महिलेला परत करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले.

अ‍ॅलिस डिसूझा यांना परत दिले जाणारे फ्लॅट मेट्रो सिनेमाच्या मागे बॅरॅक रोडवरील रुबी मॅन्शनच्या पहिल्या मजल्यावर आहेत. २८ मार्च १९४२ रोजी भारतीय संरक्षण विभागाकडून रुबी मॅन्शनची या इमारतीची मागणी करण्यात आली. पण कालांतराने पहिला मजला वगळता मूळ मालकाला ताबा परत देण्यात आला होता. १७ जुलै १९४६ रोजी, बॉम्बेच्या गव्हर्नरने भारताच्या संरक्षण नियमांतर्गत डिसूझाचे वडील एच. एस. डायस यांना हा परिसर परत करण्याचे निर्देश सरकारी कर्मचारी असलेल्या लाड यांना दिले. २४ जुलै १९४६ रोजी जिल्हाधिकार्‍यांनी सुद्धा सदनिका मुक्त करण्याचे निर्देश दिले. पण निर्देश असूनही डायस यांना ताबा देण्यात आला नाही. दरम्यान, लाड यांचा मृत्यू झाला होता. २०१२ मध्ये, लाड यांच्या मुलाने आणि मुलीने उच्च न्यायालयात धाव घेतली. तेथेही अनेक वर्ष प्रकरण चालल्यानंतर आता डिसूझा यांना त्यांच्या फ्लॅटचा आठ आठवड्यांच्या आत शांततापूर्ण ताबा देण्याचे निर्देश दिले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top