डबलिन :
भारतात मोठ्या प्रमाणावर सेवा देणाऱ्या जागतिक आयटी सेवा कंपनी ॲक्सेंचरने गुरूवारी (२३ मार्च) आर्थिकस्थिती आणि मंदावलेल्या महसूल यांच्या पार्श्वभूमीवर सुमारे १९ हजार नोकरकपातीची घोषणा केली. आर्थिक वर्ष २०२३च्या दुसऱ्या तिमाहीसाठी कंपनीचे तिमाही निकाल घोषित करताना कंपनीने तिची वार्षिक महसूल वाढ आणि नफ्याचा अंदाज देखील कमी केला.
ॲक्सेंचर ही जागतिक पातळीवर सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक आहे. ॲक्सेंचरच्या अलीकडील वार्षिक अहवालात २०२२ मध्ये ७ लाख २१ हजार कर्मचारी असल्याचे म्हटले होते. कंपनीने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये संपलेल्या२०२२ आर्थिक वर्षात सुमारे एक लाख लोकांना कामावर घेतले होते.
कंपनीच्या मुख्य कार्यकारी ज्युली स्वीट यांनी गुरुवारी सांगितले की, \’आम्ही चक्रवाढ वेतन महागाईच्या कठीण आव्हानांना सामोरे जात आहोत आणि आम्ही ते किंमतीसह करत आहोत परंतु आम्ही ते खर्च कार्यक्षमता आणि डिजिटायझिंगसह देखील करत आहोत.\’
यावेळी कंपनीने म्हटले की, \’जगभरातील अनेक बाजारपेठांमध्ये लक्षणीय आर्थिक अनिश्चितता आहे. ज्याचा आमच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे आणि त्याचा परिणाम होत राहील, विशेषत: विदेशी चलन विनिमय दरांमधील अस्थिरतेच्या संदर्भात परिणाम जाणवत आहे.\’
इनडीडकडून २,२०० कर्मचारी कपात
जॉब पोर्टल इनडीडने २२०० कर्मचारी काढून टाकले आहेत. ज्या कंपनीचे ध्येय लोकांना नोकऱ्या मिळवून देणे हे आहे त्यांच कंपनीने हा निर्णय घेतला. सीईओच्या म्हण्यानुसार, \’ते मूळ वेतनात २५ टक्के कपात करणार आहेत. त्यापैकी निम्म्या नोक-या प्रशासकीय किंवा सपोर्ट फंक्शन्स विभागातील आहेत. ग्राहकांचे बिलिंग होते त्या विभागातील नोक-या जाणार नाही.\’