नागपूर – भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आजपासून महाराष्ट्राच्या ३ दिवसांच्या दौऱ्यावर आल्या आहेत. आज त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केले.
आज नागपुरातील मुक्कामानंतर राष्ट्रपती ५ जुलैला सकाळी गडचिरोलीकडे प्रयाण करतील. गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा १० वा दीक्षांत समारंभ तसेच अडपल्ली कॅम्पस येथील प्रस्तावित प्रशासकीय इमारतीच्या कोनशिला समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती नागपुरात परततील. त्याच दिवशी दुपारी कोराडीतील महालक्ष्मी देवीचे दर्शन व आरतीमध्ये त्या सहभागी होतील. त्यानंतर कोराडी मंदिर परिसरातील सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. कोराडी येथे भारतीय विद्या भवनतर्फे रामायण सांस्कृतिक केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या केंद्रात पहिल्या दालनात रामायणाची चित्रमय मांडणी करण्यात आली आहे, तर दुसऱ्या दालनात १८५७ ते १९४७ या काळातील स्वातंत्र्यवीरांची सचित्र शौर्यगाथा मांडण्यात आली आहे. ६ जुलै रोजी सकाळी राष्ट्रपती आदिवासी समाज बांधवांशी राजभवन येथे संवाद साधतील. त्यानंतर मुंबईकडे प्रस्थान करतील
राष्ट्रपती मुर्मू यांचे नागपूरमध्ये आगमन
