पंढरपूर – 63 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मोजक्या वेळा मंदिरामध्ये देवदर्शनाला जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पंढपुरात विठूरायाच्या दर्शनासाठी पोहोचले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याच्या घोषणेनंतर उठलेले वादळ शमल्यावर पवार सध्या सोलापूर जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. यात राजकीय उरकल्यावर त्यांनी रविवारी पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी याचा व्हिडिओही ट्विट केला.
शरद पवार यापूर्वी 2017 मध्ये या मंदिरात आले होते. श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनाचा व्हिडिओ ट्विट करत त्यांनी लिहिले, ‘आज पंढरपूर दौर्यावर असताना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भेट देऊन विठ्ठल-रखुमाईचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी राज्यातील बळीराजाच्या सुख संपन्नतेसाठी विठ्ठल चरणी साकडे घातले.’
2017 नंतर शरद पवार विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात
