2024 पर्यंत निधी मिळणार नसेल तर भीक मागेन, पण दिल्लीत जाणार नाही

कोलकता – आम्हाला 2024 पर्यंत निधी मिळणार नाही, अशा चर्चा आहेत. असे झाले तर गरज पडल्यास मी बंगालच्या माता-भगिनींसमोर पदर पसरेन, पण कधीही दिल्लीत केंद्र सरकारकडे भीक मागणार नसल्याचे ठणकावले आहे. ममता बॅनर्जी गुरुवारी कोलकाता येथे एका जाहीर सभेला संबोधित करत होत्या. त्यादरम्यान त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
केंद्र सरकारकडून बंगालला निधी दिला जात नसल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सातत्याने करत आहेत. या मुद्यावरून 29-30 मार्च रोजी कोलकाता येथे बंगाल सरकारला निधी दिला जात नसल्याचे आरोप करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दोन दिवसांचे धरणे आंदोलन केले होते. केंद्रीय अर्थसंकल्पातही मनरेगा आणि गृहनिर्माण योजनेसाठी आम्हाला एक रुपयाही देण्यात आलेला नाही. केंद्र सरकार सर्वसामान्यांचा पैसा रोखून धरत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. बंगालमधील लोकांच्या रोजगाराचा पैसा केंद्राला परत करावा लागेल. तसेच यावेळी गॅसच्या किमती वाढल्याने महागाईच्या झळा सर्वसामान्यांना सोसाव्या लागत असल्याचे म्हणत केंद्र सरकारवर टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा गुरुवारी कोलकाता येथे एका जाहीर सभेत केंद्र सरकारवर
हल्लाबोल केला.
यावेळी ममता यांनी केंद्र सरकारकडून राज्याचे सात हजार कोटी रुपये देणे बाकी असल्याचे सांगत यापूर्वीची थकबाकीही सरकारने दिली नसल्याचे त्या म्हणाल्या. 55 लाख घरांच्या बांधकामासाठीच्या गृहनिर्माण योजनेचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. 12 हजार गावांमधील खराब रस्त्यांची दुरुस्ती आम्ही करत आहोत. यासाठी केंद्राकडून कोणताही निधी मिळालेला नाही, असेही त्या म्हणाल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top