संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 29 March 2023

Medical Emergency मध्ये तासांभरात मिळतील लाखभर रुपये

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वैद्यकीय आप्तकालीन काळासाठी (Medical Emergency) आपल्याकडे पैसे नसल्यास प्रचंड धावाधाव करावी लागते. अनेकदा अधिकच्या व्याजाने पैसे उचलावे लागतात. तसेच, या काळात आपल्याला नेमकी किती रुपायंची गरज लागणार आहे याचीही कल्पना नसते. त्यामुळे आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागते. मात्र, अशा काळात भविष्य निर्वाह निधीमधून एक लाख रुपयांपर्यंतची तत्काळ रक्कम काढू शकता.

केंद्र सरकारने १ जून २०२१ रोजी परिपत्रक जारी करून ही सोय उपलब्ध करून दिली होती. ईपीएफओचा नोकरदार वर्ग वैद्यकीय आप्तकालीन काळात १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम तत्काळ बँकेत ट्रान्सफर करून घेऊन शकतात. महत्वाचे म्हणजे ही रक्कम काढायला पूर्वी तीन ते सात दिवसांचा अवधी लागायचा. मात्र आता अवघ्या तासाभरांत हे पैसे तुमच्या खात्यात ट्रान्सफर होऊ शकतात.

कसे काढाल पैसे

पैसे तत्काळ ट्रान्सफर करण्यासाठी www.epfindia.gov.in संकेतस्थळावर जा. त्यानंतर ऑनलाइन एडव्हांस क्लेम वर क्लिक करा. तुम्ही थेट https://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface या लिंकवर जाल. येथील ऑनलाईन सेवावर जा आणि त्यानंतर क्लेम करण्यासाठी फॉर्म -31,19,10 सी आणि 10 डी भरावा लागेल.

बँक खात्याचे अखेरची चार अंक पोस्ट करा, त्यानंतर खाते व्हेरिफाय करा. Proceed for Online Claim वर क्लिक करा. ड्रॉप डाउनमधून PF Advance हा पर्याय निवडा (Form 31)
पैसे काढण्याचे कारण निवडा. त्यानंतर हवी ती रक्कम टाका, चेकची स्कॅन कॉपी अपलोड करा. तिकडे पत्ताही टाका. Get Aadhaar OTP वर क्लिक करा…  आधार लिंक्ड मोबाइल वर आलेला OTP पोस्ट करा. तुमचा क्लेम फाईल झाल्यानंतर अन् त्याला दुजोरा मिळाल्यानंतर एक तासभराच्या आतमध्ये खात्यावर पैसे जमा होतील.

महत्त्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला कोणतेही कागदपत्र जमा करावी लागणार नाहीत. तुम्हाला पीएफवरुन मेडिकल एडव्हांससाठी अप्लाय करायचे आहे. त्यानंतर अवघ्या तासभरात तुम्हाला पैसे मिळतील.

आजचे हवामान
ताज्या बातम्या