संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

शौचालयाची टाकी साफ करताना 4 जण टाकीत पडले; तिघांचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – शौचालयाची टाकी साफ करताना टाकीत चार तरुण पडल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील प्यासा हॉटेलच्या पाठीमागे घडली आहे. या दुर्घटनेमध्ये तिघांचा दुर्देेवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र जयसिंग काळभोर यांचे प्यासा हॉटेलच्या मागीलबाजूस जय मल्हार कृपा बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगच्या शौचालयाची टाकी उपसण्याचे काम सुरू होते. त्यावेळी टाकी साफ करणारी एक व्यक्ती टाकीत पाईप टाकताना तोल जावून पडली. या व्यक्तीला वाचवण्यासाठी गेलेले तिघेही या टाकीत पडले. या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने एकाला टाकीतून बाहेर काढले. त्याला पुढील उपचारासाठी एका खाजगी दवाखान्यात पाठविण्यात आले आहे. तर तिघांचा टाकीत बुडून मृत्यू झाला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami