तलवारीने हल्ला झालेल्या रामदास आखाडे यांचे निधन

पुणे – पुण्यातील गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांचे आज पहाटे निधन झाले. रविवारी त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. रामदास आखाडे यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी व दोन मुले असा परीवार आहे.

रामदास आखाडे यांच्यावर रविवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास तलवारीने हल्ला झाला. हा हल्ल्यात त्यांच्यावर तलवारीचे चार घाव बसले. यात आखाडे गंभीर जखमी झाल्याने, त्यांना उपचारासाठी तात्काळ लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पीटल या खासगी रुग्नालयात उपचारासाठी दाखल केले होते.

उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती बिघडत जात होती. यामुळे त्यांच्यावर जहांगीर रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र रामदास आखाडे यांची मृत्युशी चाललेली झुज बावन्न तासानंतर अखेर बुधवारी पहाटे अपयशी ठरली.

दरम्यान, रामदास आखाडे यांच्यावर रविवारी झालेल्या हल्ल्यातील तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र या हल्ल्यामागील मास्टमाईंड अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. यामुळे हल्ल्याचे नेमके कारण समजु शकलेले नाही. मात्र प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीवरुन हा हल्ला व्यावसायिक स्पर्धेतुन झाला असण्याची शक्यता बळावली आहे.

Share with :
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on pinterest
Pinterest
Share on linkedin
LinkedIn

Leave a Comment

Your email address will not be published.

Close Bitnami banner
Bitnami