रिलायन्सने फ्युचर ग्रुपच्या 200 स्टोअरचे कामकाज ताब्यात घेतल्यानंतर रोखीच्या तुटवड्याचा सामना करणाऱ्या फ्युचर ग्रुप कंपन्यांच्या शेअर्समध्ये सोमवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली.
रिलायन्स रिटेलने फ्युचर रिटेलच्या किमान 200 स्टोअर्सचा ताबा घेतला. त्यानंतर फ्युचर सप्लाय चेन सोल्युशन्सचे शेअर्स 17 टक्क्यांनी वाढून 71.50 रुपयांवर पोहोचले. तर फ्युचर रिटेलचे शेअर्स 13 टक्क्यांनी वाढून 51.75 रुपयांवर आणि फ्युचर मार्केट नेटवर्कचे शेअर 10 टक्क्यांनी वाढून 9.70 रुपयांवर पोहोचले. तसेच फ्युचर एंटरप्रायझेस आणि फ्युचर लाइफस्टाइल फॅशन्सचे शेअर 9 टक्क्यांनी वाढून अनुक्रमे 8.99 रुपये आणि 56.35 रुपये झाले. फ्युचर कन्झुमरचे शेअर 7 टक्क्यांनी वाढून 7.36 रुपये झाले. तर फ्युचर एंटरप्रायजेस डीव्हीआरचे शेअर 19 टक्क्यांनी वाढून 12.85 रुपये झाले.
दरम्यान, फ्युचर ग्रुप गंभीर आर्थिक संकटात होता. कर्जदार आणि जमीनदारांची थकबाकी 6,000 कोटींच्या पुढे गेली आहे. रिलायन्सने आतापर्यंत ही थकबाकी भरण्यासाठी 1,500 कोटी रुपये खर्च केले आहेत.