देशाला टुजी मुक्त करायचंय, मुकेश अंबांनींकडून जगातील सर्वांत स्वस्त स्मार्टफोनची घोषणा; ‘या’ दिवशी होणार लॉन्च

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई – जगातील सर्वांत स्वस्त फोन रिलायन्स इंडस्ट्रीने  सादर केला असून मुकेश अंबानी यांनी भारतात JioPhone Next ची घोषणा केली आहे. रिलायन्स समुहाच्या वार्षिक सभेदरम्यान हा मोबाईल फोन जगातील सर्वांत स्वस्त मोबाईल फोन असले असा दावा केला आहे.

“भारताला टूजी मुक्त करायचं असेल, तर सर्वांना परवडेल अशा खऱ्या अर्थाने स्वस्त स्मार्टफोनची गरज आहे. त्या आधारावर जिओ आणि गुगल यांनी मिळून जिओ फोन नेक्स्ट डेव्हलप केला असून भारतात तो लाँच केला जाणार आहे”, असं मुकेश अंबानी यावेळी म्हणाले.

जिओ आणि गुगलने संयुक्तपणे हा फोन तयार केला असून तो पूर्णपणे फीचर स्मार्टफोन असणार आहे. या फोनसाठी अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमचं ऑप्टिमाईज्ड व्हर्जन तयार करण्यात आलं आहे. या फोनमध्ये अँड्रॉइड, गुगल आणि जिओचे सर्व मोबाईल अॅप्लिकेशन्स युजर्सला वापरता येणार आहेत. खास भारतीय बाजारपेठेसाठी गुगल आणि जिओनं संयुक्तपणे हा फोन विकसित केला असून इतर स्मार्टफोन फीचर्सप्रमाणेच या फोनमध्ये अनेक फीचर्स असणार आहेत, अशी माहिती यावेळी मुकेश अंबानी यांनी दिली. दरम्यान, या फोनची किंमत एजीएममध्ये जाहीर करण्यात आली नसून लवकरच ती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.


१० सप्टेंबरला होणार JioPhone Next लाँच

दरम्यान, या नव्या फोनची किंमत जरी जाहीर करण्यात आली नसली, तरी हा फोन या वर्षी १० सप्टेंबर रोजी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी लाँच केला जाईल, असं मुकेश अंबानी यांनी यावेळी जाहीर केलं. त्यामुळे लवकरच देशाला टूजी मुक्त करता येणं शक्य होणार असल्याचं मुकेश अंबानी यावेळी म्हणाले. येत्या काही दिवसांत या फोनची किंमत देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये व्हॉइस असिस्टन्स, ऑटोमॅटिक रीड अलाऊड, स्मार्ट कॅमेरा असे फीचर्स असणार आहेत. JioPhone Next आधी भारतात लाँच केला जाईल आणि नंतर जगभरातल्या बाजारपेठांमध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.

Close Bitnami banner
Bitnami