ईशा अंबानी संस्थापक असलेल्या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने (RRVL) रविवारी क्लोव्हियामध्ये 950 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. तसेच, या कंपनीतील 89 टक्के इक्विटी स्टेक खरेदी केला. RRVL कंपनी पर्पल पांडा फॅशन्समधील भागीदारी विकत घेणार आहे. तसेच, या कंपनीतील उर्वरित भागीदारी संस्थापक टीम आणि व्यवस्थापनाकडे असेल असं त्यांनी संयुक्तरित्या जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
अंतर्वस्त्र विक्रीसाठी प्रसिद्ध असलेली क्लोव्हिया कंपनी २०१३ मध्ये पंकज वर्मानी, नेहा कांत आणि सुमन चौधरी यांनी स्थापन केली होती. भारतातील ही अग्रगणी कंपनी असून भारतीयस्त्रियांची पहिली पसंती ठरली आहे. इंटिमेट वेअर स्पेसमधअये या कंपनीचा मजबूत कस्टमर बेस असल्याने कंपनीचे सर्व डिजायनर वस्त्र ग्राहकांना आकर्षित करून घेतात.
रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने क्लोव्हियासोबत भागीदारी करताना ईशा अंबानी यांनी म्हटलं की, रिलायन्स नेहमीच लोकांना निवडीसाठी पर्याय देतो. तसेच, ग्राहकांना सर्वांत चांगल्या वस्तू पुरवण्यात आघाडीवर ही कंपनी राहिली आहे. त्यामुळे आम्ही आमच्या पोर्टफोलिओमध्ये स्टाईल, गुणवत्ता आणि उत्कृष्ट डिजाईन असलेला लॉँजरी ब्रॅण्ड क्लोव्हियाचा समावेश करताना खूप खूश आहोत. या बिझनेसला अधिक उंचीवर नेण्यासाठी आम्ही क्लोव्हियामध्ये एका चांगल्या मजबूत टीमसोबत काम करू.”
या कराराबाबत बोलताना Clovia चे संस्थापक आणि CEO पंकज वर्मानी म्हणाले की, Clovia रिलायन्स रिटेल कुटुंबाचा एक भाग बनण्यास उत्सुक आहे. या भागीदारीद्वारे, आम्हाला रिलायन्सच्या स्केल आणि रिटेल कौशल्याचा फायदा होईल आणि ब्रँडचा विस्तार होईल. एकत्रितपणे आम्ही इंटिमेट वेअर कॅटेगरीमध्ये जागतिक दर्जाची गुणवत्ता, डिझाईन आणि फॅशन रिच प्रॉडक्ट्स उत्तम किमतीत ग्राहकांसाठी बाजारात उपलब्ध करून देऊ. आम्ही क्लोव्हियाला या कॅटेगरीतील सर्वात पसंतीचा आणि लोकप्रिय ब्रँड बनवण्यास उत्सुक आहोत.