नाशिक – कोरोना कळात शाळा बंद असल्यामुळे शालेय पोषण आहार योजना देखील बंद होती. मात्र असे असतानाही शालेय पोषण आहाराचे काम दिलेल्या एका ठेकेदाराकडून हा तांदूळ गेली ३ वर्षे दडवून ठेवण्यात आला. हा तांदूळ सरकारकडे का जमा केला गेला नाही असा प्रश्न उपस्थित करत, दडवून ठेवलेला १४ हजार किलो तांदूळ जप्त करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेली ३ वर्षे शाळा बंद आहेत. असे असताना पोषण आहारही बंद होता. मात्र सेंट्रल किचन योजनेतील अडीच ते तीन वर्षांपूर्वीचा जवळपास १४ हजार किलो तांदूळ जप्त करण्यात आला आहे. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत १३ ठेकेदांराना शालेय पोषण आहाराचे काम देण्यात आले होते. त्यातील एका ठेकेदाराने तांदूळ दडवून ठेवलेला निकृष्ट दर्जाचा तांदूळ महिला बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पहाणी दौऱ्या दरम्यान हा सारा प्रकार बचत गटाच्या महिलांकडून उघड करण्यात आला. त्यामुळे आता पोषण आहार बंद असताना तांदूळ शासनाला जमा का करण्यात आला नाही. अडीच तीन वर्षे दडवून का ठेवण्यात आला असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत असून, हा अहवाल शिक्षण विभागाकडून मनपा आयुक्तांना पाठवणार असून या पुढील करावाई केली जाणार असल्याचे समजते.