संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

युक्रेनमध्ये अडकलेल्या आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कीव्ह – युक्रेनमध्ये मंगळवारी गोळीबारात एका वैद्यकीय शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असताना आज पुन्हा एकदा एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. चंदन जिंदाल असं या २२ वर्षीय विद्यार्थ्याचं नाव असून तो काही दिवसांपासून आजारी होता. या आजारपणातच त्याचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेले अनेक भारतीय जीवाच्या आकांताने भारतात परतण्याचा प्रयत्न करत आहेत.

इस्केमिक स्ट्रोकच्या आजारामुळे चंदन जिंदालवर विनिस्टीयामधील इमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. नवीन जिंदालच्या मृत्यूची बातमी त्याच्या कुटुंबियांना कळवण्यात आली आहे. या विद्यार्थ्याच्या वडिलांनी केंद्र सरकारला एक पत्र लिहून आपल्या मुलाचे शव भारतात आणले जावे अशी विनंती केली आहे. 

युक्रेनमध्ये अजूनही अनेक भारतीय नागरिक आणि विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रशियाने केलेल्या हल्ल्यात अनेक युक्रेनियन नागरिक मारले गेले आहेत. त्यात युक्रेनच्या सैनिकांचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतीय नागरिकही हवालदिल झाले आहेत. दरम्यान, मंगळवारी एका विद्यार्थ्याचा गोळीबारात मृत्यू झाला. तर आज एका विद्यार्थ्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.

युक्रेनमध्ये परिस्थिती चिघळत असल्याने केंद्र सरकारने हालचाली वाढवल्या आहेत. दरम्यान, भारतीयांनी लवकरात लवकर युक्रेन सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, खार्किव्हमध्ये अडकलेल्या नागरिकांनी लवकरात लवकर येथून निघून जाण्याचे आवाहनही युक्रेनमधील भारतीय दुतावासांनी केलं आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami