जर तुम्ही निश्चित उत्पन्नासह कर बचतीचा पर्याय शोधत असाल, तर SBIच्या कर बचत FD योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवणूक केल्याने परिपक्वतेवर परतावा करपात्र आहे. त्यानुसार 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर कलम 80C अंतर्गत कर कपातीचा दावा केला जाऊ शकतो. टॅक्स सेव्हिंग एफडीचा लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा असतो. यामुळे पगारदार कर्मचाऱ्यांसाठी हा सुरक्षित पर्याय मानला जात आहे. या योजनेत किमान 1,000 रुपये भरुन खाते उघडता येते. शिवाय यात कोणतीही कमाल ठेव मर्यादा नाही.
बँकेच्या FD योजनेंतर्गत, नियमित ग्राहकांना 5 वर्षांच्या मुदत ठेवींवर 5.40 टक्के वार्षिक व्याज दिला जात आहे. त्यामुळे जर तुम्ही 5 लाखांची FD केली तर परिपक्वतेवर तुम्हाला 6,53,800 रुपये मिळतील. यामध्ये व्याजातून 1,53,800 रुपये उत्पन्न मिळेल. बँकेच्या मुदत ठेवींवरील व्याज तिमाही आधारावर चक्रवाढ होते. तसेच जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, तर FD व्याजदर वार्षिक 6.20 टक्के मिळेल. त्यामुळे आता तुम्ही 5 लाख रुपये जमा केले, तर परिपक्वतेवर तुम्हाला 6,80,093 रुपये मिळतील. यामध्ये व्याजाद्वारे 1,80,093 रुपये उत्पन्न मिळेल.