संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 07 December 2022

SBI आणि BOI बँकेतील ग्राहकांसाठी महत्त्वाचा अलर्ट

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी बँकांनी महत्त्वाचा अलर्ट दिला आहे. बँकेतील खातेधारकांनी पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याचे आवाहन केले असून त्यासाठी ३१ मार्च २०२२ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. बँकेची सेवा अखंडित ठेवण्यासाठी पॅन कार्ड-आधार कार्ड लिंक करण्यास सांगण्यात आले आहे.

गैरसोय टाळण्यासाठी आणि बँकेची अखंड सेवा घेण्यासाठी ग्राहकांनी पॅन आधारशी लिंक करावे असा सल्ला स्टेट बँक ऑफ इंडियाने दिला आहे. तसेच, बँक ऑफ इंडियानेही आपल्या ग्राहकांना ३१ मार्चपूर्वी पॅन-आधार लिंक करण्यास सांगितले आहे.

पॅन कार्ड बँक खाती उघडणे, बँक खात्यात रोख रक्कम जमा करणे, डिमॅट खाते उघडणे, स्थावर मालमत्तेचे व्यवहार करणे आणि बाँडमध्ये व्यवहार करण्यासाठी गरजेचे असते. तर, आधार हे बायोमेट्रिक आधारित आहे आणि इतर कोणत्याही ओळख दस्तऐवजाच्या आधारे ते मिळवता येत नाही.

आधारशी पॅन कसे लिंक कराल?

https://www.incometaxindiaefiling.gov.in/home या आयकर विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या. तसेच, ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर UIDPAN<१२ अंकी आधार क्रमांक>>१० अंकी पॅन क्रमांक> या फॉरमॅटमध्ये एसएमएस पाठवल्यास तुम्हाला आधार-पॅन कार्ड लिंक करता येईल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami