संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 19 January 2022

Shree Cement Ltd. : गुंतवणूकदारांची पकड मजबूत करणारी सिमेंट कंपनी

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

घराच्या मजबूत भिंतीसाठी तितक्याच चांगल्या प्रतीच्या सिमेंटची गरज असते. जर हेच सिमेंट तुम्ही तुमच्या स्टॉकमध्ये समाविष्ट केलं तर तुमचा बँक बॅलन्सही तितकाच मजबूत होईल. आज आपण अशाच एका सिमेंट कंपनीची माहिती पाहणार आहोत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या काही वर्षात चांगलेच मालामाल बनवले आहे.

श्री सिमेंट असं या कंपनीचं नाव असून १९७९ साली राजस्थान येथे या कंपनीची स्थापना झाली होती. देशातील सर्वाधिक मोठी सिमेंट कंपनी म्हणून या कंपनीची ओळख आहे. या कंपनीने गेल्या दहा वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल १७०० टक्के अधिक परतावा दिला आहे. २ सप्टेंबर २०११ ला श्री सिमेंट कंपनीची शेअर प्राईज १६६८.३५ एवढी होता. २०२१ पर्यंत या शेअर्सची किंमत ३० हजार २५५.३५ रुपयांपर्यंत पोहोचली. म्हणजे मधल्या दहा वर्षांत या कंपनीने गुंतवणूकदारांना तब्बल १७१३.३२ टक्के परतावा दिला आहे. या कंपनीचे शेअर्स १८ पटीने वाढले आहेत. तर, नुकतेच शुक्रवारी १४ जानेवारी रोजी सकाळी ११.२६ मिनिटांनी या कंपनीचे शेअर्स ०.४५ टक्क्यांनी वधारले.

दरम्यान, आंध्र प्रदेश आणि आणि राजस्थान येथे या कंपनीकडून मोठे सिमेंट प्लांट तयार करण्यात येणार आहेत. आंध्र प्रदेशचा प्रकल्प १५०० कोटींचा असून राजस्थान येथील प्रकल्प ३५०० कोटींचा असणार आहे.

सिमेंट उत्पादनसोबतच ही कंपनी वीज निर्मितीही करते. श्री पॉवर आणि श्री मेगा पॉवर या उपकंपन्यांद्वारे वीज निर्मिती केली जाते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami