संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

आमदार निवासमध्ये सनी लियोनी थिरकणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री सनी लियोनीने बॉलीवूडमध्ये आपले स्थान निर्माण केल्यानंतर तिने प्रादेशिक सिनेमाकडे आपला मोर्चा वळवला. तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड दर्शकांना उत्कृष्ट अदा दाखवल्यानंतर सनी मराठीमध्ये दुसऱ्या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. यापूर्वी सनीने बॉईज या मराठी चित्रपटाच्या ‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’ या गाण्यावर थिरकून मराठी प्रेक्षकांची मने जिंकली होती. लवकरच सनी लियोनी संजीव कुमार राठोड निर्मित व दिग्दर्शित मराठी चित्रपट आमदार निवासामध्ये ‘शांताबाई’ या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. आगामी आमदार निवास या चित्रपटाच्या निमित्ताने सनी आपल्याला आधुनिक शांताबाई रूपाने भेटणार आहे. या मराठी आयटम साँगची बॉलीवूडने सुद्धा दखल घेतली असून या गाण्याची चर्चा बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा रंगू लागली असून आधुनिक ‘शांताबाई’चा अवतार पाहायला सगळेच  उत्सुक आहेत.

२०१५ मध्ये शांताबाई या गाण्याने महाराष्ट्रात नाही संपूर्ण जगात अक्षरश: धुमाकुळ घातला होता. आतापर्यंत युट्युबवर या गाण्याला ८५ करोडहुन जास्त व्हीज असून सुमीत म्युझिकच्या मालकीचे हे गाणे आता जय जगदंब प्रोडक्शनने घेतले असून महाराष्ट्राची आधुनिक ‘शांताबाई’ म्हणून सनी लियोनी दिसणार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर विष्णू देवाने या आयटम साँगचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. तर संजय लोंढे यांचे मूळ गीत असलेलं हे गाणं नितीन सावंत यांनी पुर्ननिर्मित करून या गाण्याला आधुनिकतेची झालर घातली आहे. ‘शांताबाई’ या गाण्याची भव्यता आणि गावरान बाज असलेल्या ‘सनी लिओनी’ची दिलखेच अदांनी प्रेक्षकांचा काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही तर या शांताबाई या गाण्याच्या निमित्ताने गायक संजय लोंढे याना एक मोठी संधी संजीवकुमार राठोड यांनी दिली आहे. सत्य घटनेवर प्रेरित असून सामाजिक दृष्टया दुर्लक्षित अशा विषयावर ‘आमदार निवास’ भाष्य करतो. सामाजिक आणि राजकीय गोष्ट सांगणारा चित्रपट आमदार निवास लवकरच चित्रपट गृहात प्रेक्षकांच्या मनोरंजनास सज्ज होणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami