संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

ट्विन टॉवर २२ मेपर्यंत पाडले जातील; नोएडा प्राधिकरणाचे सर्वोच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्र

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – नोएडामधील रिअल इस्टेट डेव्हलपर सुपरटेकचे बेकायदेशीरपणे उभारलेले ४० मजली टॉवर पाडण्याचे काम २२ मेपर्यंत पूर्ण केले जाईल, अशी माहिती नोएडा प्राधिकरणाने आज सर्वोच्च न्यायालयात दिली. ते पाडण्याचे काम आधीच सुरू झाले आहे, असे त्यात म्हटले आहे. न्यायालयाने नोएडा प्राधिकरण आणि सुपरटेक यांना प्राधिकरणाच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या सर्व टाइमलाइनचे पालन करण्यास सांगितले आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी १७ मे रोजी होणार आहे, या प्रकरणातील पुढील सुनावणीवेळी कामाबाबतचा प्रगती अहवाल देण्यास प्राधिकरणाला सांगण्यात आले आहे.

सोमवारी न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. दरम्यान, ७ फेब्रुवारी रोजी, सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले होते की, रिअल-इस्टेट कंपनी सुपरटेक लिमिटेडने नोएडा येथील एमराल्ड कोर्ट प्रकल्पात नियमांचे उल्लंघन करून बांधलेले ट्विन टॉवर दोन आठवड्यांच्या आत पाडण्याचे काम सुरू करावे. सुप्रीम कोर्टाने सुपरटेकला २८ फेब्रुवारीपर्यंत सर्व गृहखरेदीदारांना परतावा देण्याचे निर्देश दिले होते. १७ जानेवारी रोजी, सर्वोच्च न्यायालयाने नोएडा प्राधिकरणाने अंतिम केलेल्या डोमॉलीश एजन्सीच्या प्रस्तावास मान्यता दिली होती. सुपरटेकला आठवडाभरात ‘एडिफाईस’ या एजन्सीसोबत करार करण्यास सांगण्यात आले. यापूर्वी, नोएडाच्या सेक्टर ९३ मधील ट्विन टॉवर्समध्ये फ्लॅट खरेदी करणाऱ्या गृहखरेदीदारांना परतावा देण्याच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल न्यायालयाने बिल्डरला फटकारले होते आणि चेतावणी दिली होती की, त्याच्या संचालकांना “न्यायालयाशी खेळी केल्याबद्दल” तुरुंगात पाठवले जाईल. दरम्यान, ३१ ऑगस्ट २०२१ रोजी, सर्वोच्च न्यायालयाने सुपरटेकला ४० मजली ट्विन टॉवर तीन महिन्यांत पाडण्याचे निर्देश दिले होते आणि नियमांचे उल्लंघन करून नकाशे आणि इमारत योजना मंजूर करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांवर खटला चालवण्याचे निर्देश दिले होते. तसेच सर्व घर खरेदीदारांना १२ टक्के व्याजासह परतावा देण्याचे आदेश दिले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami