T20 World Cup 2021 : पाकिस्तानला धक्का! शोएब मलिक, रिझवान आजारी

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

दुबई – यूएई येथे सुरू असलेल्या विश्वचषकात पाकिस्तानने दमदार कामगिरी केली आहे. साखळी फेरीतील पाचही सामन्यात विजय मिळवत पाकिस्तान संघाने एकहाती उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. आज पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषकातील दुसरा उपांत्य सामना रंगणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी पाकिस्तानसाठी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. विश्वचषकात दमदार कामगिरी करणारा मोहम्मद रिझवान आणि अनुभवी शोएब मलिक आजारी असल्याचे कळते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद रिझवान आणि शोएब मलिक यांना बुधवारी सकाळी ताप आला होता. त्यामुळे त्यांनी ट्रेनिंगमध्येही सहभाग घेतला नाही. सुदैवाने दोघांनी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. दरम्यान, पाकिस्तान संघ व्यवस्थापनाला दोघांच्याही खेळण्याची आपेक्षा आहे. मात्र सामन्यापूर्वी त्यांची पुन्हा एकदा तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर दोघांच्या खेळण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे 2016 मध्ये साखळी फेरीत गारद होणाऱ्या पाकिस्तान संघाने यूएईत सुरु असलेल्या स्पर्धेत दमदार कामगिरी करत सर्वांनाच चकीत केले आहे. विशेष म्हणजे यंदाच्या स्पर्धेत पराभव न स्वीकारणारा पाकिस्तान एकमेव संघ आहे. आज ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये उपांत्य सामन्यात लढाई होणार आहे.

Close Bitnami banner
Bitnami