संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 07 December 2022

TeamLease Services Limited : नोकर भरतीसाठी सहकार्य करणारी कंपनी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

भारतातील विविध कंपन्यांना नोकर भरतीमध्ये सहाय्य करणारी कंपनी म्हणजे TeamLease Services Limited. २००० साली या कंपनीची स्थापना इंडिया लाईफ चक्रवर्ती अॅक्चुरिअल सर्व्हिसेस लिमिटेड या नावाने झाली होती. २००२ साली या कंपनीने नाव बदलून Team Lease Services Private असे केले. त्यानंतर ही कंपनी २०१५ मध्ये पब्लिक लिस्टेड कंपनी बनली.

रिक्रुटमेंट आणि एचआर सर्व्हिसेससाठी ही कंपनी ओळखली जाते. भारतातील अनेक कंपन्या TeamLease अंतर्गत नोकर भरती करतात. नोकरी शोधणारे आणि नोकरी देणाऱ्यांसाठी या कंपनीचे डिजिटल प्लॅटफॉर्मही असून या कंपनीने आतापर्यंत लाखो बेरोजगारांना नोकरी उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच, अनेक कंपन्यांना एचआर सेवा पुरवून कंपनीची वाढ केली आहे.

दरम्यान, डिसेंबर २०२१ मध्ये जाहीर झालेल्या तिमाहित या कंपनीचे शेअर ११ टक्क्यांनी घसरले होते. मात्र, गेल्या पाच वर्षांचा विचार केल्यास या कंपनीने खूप चांगली प्रगती साधली आहे. या कंपनीने आतापर्यंत ३७७ टक्के परतावा दिला आहे. गेल्या पाच वर्षांत या कंपनीने तब्बल ३ हजारपेक्षा जास्त परतावा दिला आहे. एवढेच नव्हे तर सध्याच्या अस्थिरतेच्या काळातही या कंपनीचे शेअर ग्रीन मार्कमध्ये ट्रेंड होत आहेत.

गेल्या काही वर्षांत बेरोजगारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नोकरी शोधणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. दरम्यान, प्रत्येक कंपनीला चांगल्या कर्मचाऱ्याची गरज असतेच. मात्र, कर्मचाऱ्याच्या निवडीसाठी वेळ वाया घालवणे कंपनीसाठी खर्चिक पडते. त्यामुळे अशावेळी एचआर सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना नोकर भरतीची कामे दिली जातात.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami