मुंबई – बॉलीवूडचा खिलाडी कुमार आणि भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यांनी स्टार्टअप म्हणजे एका नवनिर्मित व्यवसायामध्ये गुंतवणूक केली आहे.टू ब्रदर्स ऑरगॅनिक फार्म नावाचे पुण्यातील कृषी स्टार्टअप आहे.सेंद्रिय शेतीपूरक उत्पादने बनविणाऱ्या या कंपनीच्या व्यवसायात अक्षयकुमार आणि सेहवाग या जोडीने अन्य भागीदार व्यक्तींसह तब्बल १४.५ कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे,अशी माहिती या कंपनीचे एक भागीदार सत्यजित हांगे यांनी दिली.
टु ब्रदर्स ऑरगॅनिक फार्म या
कंपनीचे हे भांडवल कंपनीची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्रे निर्माण करण्यासाठी आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय वाढवण्यासाठी वापरला जाईल. गुंतवणुकीमुळे शेतकरी सक्षम होण्यास मदत होईल. खेड्यातील महिलांसाठी अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि ग्रामीण जीवनमान वाढेल. या कंपनीची स्थापना २०१९ मध्ये सत्यजित आणि अजिंक्य हांगे या दोन भावांनी केली होती.ही कंपनी कल्चर्ड ए२ म्हणजे देशी गाईच्या दुधापासून बनविलेले तुप,बाजरी आणि बाजरीचे पीठ,लाकडाने दाबलेले तेल आणि नट बटर म्हणजे शेंगदाणा लोणी यासह सेंद्रिय आणि नैसर्गिक घटकांवर आधारित उत्पादने विकते. हे फळे, भाज्या, तृणधान्ये, शेंगा आणि कडधान्ये यांचे एकाधिक पीक करते.
सेहवागने सांगितले की, ‘टु ब्रदर्स’ च्या शाश्वत शेती आणि ग्रामीण विकासाच्या मिशनला पाठिंबा देण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनावर आणि भारतातील आणि बाहेरील लोकांच्या आरोग्यावर सकारात्मक प्रभाव टाकला आहे,हे पाहून आनंद होतो.अक्षय कुमार म्हणाला की, या कंपनीच्या संकल्पनेने मी खूप प्रभावित झालो आहे. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना सक्षम करण्याचे काम ते करत आहेत.मलाही त्याच्याशी जोडले जावून खूप छान वाटत आहे. ही कंपनी ५३ पेक्षा जास्त देशांमध्ये आपला माल विकते.भारतातील अनेक शहरांमध्ये हे उत्पादन चालते.कंपनी तिच्या अधिकृत वेबसाइट, ई-कॉमर्स वेबसाइट, मोबाईल ऍप्लिकेशन, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि फूड सुपरस्टोअर्सद्वारे विक्री केली जाते.