मुंबई – ‘सडक २’ फेम अभिनेत्री क्रिसॅन परेराला दुबईतील शारजामध्ये ड्रग्स बाळगल्या प्रकरणी अटक केली होती.आता तिची या प्रकरणातून सुटका करण्यात आली आहे. क्रिसॅन परेरा लवकरच भारतात परतेल.
सुमारे दोन आठवड्यांपूर्वी क्रिसॅनला ड्रग्जच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. शारजा विमानतळावर उतरल्यापासून त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. त्यानंतर तिच्या कुटूंबाने तिला यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. क्रिसॅन परेराला खोट्या ड्रग्स केसमध्ये अडकवण्यात आल्याचे तिच्या कुटुंबाचे देखील हेच म्हणणे होते. अखेर अभिनेत्री क्रिसॅन परेराची बुधवारी संध्याकाळी शारजा तुरुंगातून सुटका करण्यात आली. तिचा भाऊ केविन तिच्या सुटकेसाठी प्रयत्न करत होता.
क्रिसॅनने सुटकेनंतर तिने तिच्या आईला व्हिडिओ कॉलदेखील केला. तिच्या सुटकेनंतर घरातील सगळ्यांना किती आनंद झाला, हे दाखवणारा व्हिडिओ तिच्या भावाने शेअर केला आहे. पुढील ४८ तासांत क्रिसॅन भारतात परतू शकते. या क्रिसॅन परेराच्या कुटुंबाने दुबईत एका स्थानिक वकिलाची नियुक्ती केली असून त्याची फी सुमारे १३ लाख रुपये आहे.