अमूल दूध’ की नंदिनी दूधकर्नाटकचे राजकारण तापले

बंगळुरू:

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचा प्रचाराला जोरात सुरू आहे. कर्नाटकात अमूल विरुद्ध नंदिनी दुधाच्या मुद्द्यावरून राजकरण तापले आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर रविवारी बेंगलुरु हॉटेल्स असोसिएशने जाहीर केले की, ते शहरातील अमूल उत्पादने वापरणार नाहीत. कर्नाटकातील स्थानिक शेतकर्‍यांना पाठिंबा देण्यासाठी स्थानिक ब्रँड नंदिनी वापरला जाईल. सोमवारी काँग्रेस नेते डीके शिवकुमार हसनमधील नंदिनी मिल्क पार्लरमध्ये पोहोचले. त्यांनी नंदिनी ब्रँडला पाठिंबा दिला.अमूल दूध ब्रँडचा प्रवेश कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा मुद्दा बनवला जात आहे.

शिवकुमार आणि संपूर्ण काँग्रेस पक्ष कर्नाटकातील अमूल ब्रँडच्या प्रवेशाला विरोध करत आहेत आणि याला कर्नाटकचा स्थानिक डेअरी ब्रँड नंदिनी संपवण्याचा कट असल्याचे म्हटले आहे.आश्चर्याची बाब म्हणजे हॉटेल असोसिएशनच्या या निर्णयापूर्वीच काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी अमूल ब्रँडला विरोध करून निवडणुकीपूर्वी हा महत्त्वाचा राजकीय मुद्दा बनवला होता. आता गुजरात विरुद्ध कर्नाटक असा समान कर्नाटक विधानसभा निवडणूकच्या प्रचारात रंगू लागला आहे.

देशातील सर्वात मोठ्या दूध उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या अमूल आणि कर्नाटकातील नंदिनी या स्थानिक ब्रँडमधील वाद हा पाच दिवसांपूर्वी सुरू झाला होता. ५ एप्रिल रोजी, गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क फेडरेशन जे अमूल ब्रँड अंतर्गत डेअरी उत्पादने विकतात, त्यांनी ट्विट केले होते की ते कर्नाटकात प्रवेश करण्यास तयार आहेत.अमूलने आपल्या ट्वीट केले की, दूध आणि दह्यासह ताजेपणाची एक नवीन लाट लवकरच बेंगळुरूमध्ये येत आहे. अधिक तपशील लवकरच येत आहेत. अलर्ट लॉन्च करा.अमूलच्या या ट्विटनंतर कर्नाटकातही राजकारण पेटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top