मुंबई – – गणेशदर्शनासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांच्या सोयीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने रविवारी दिवस घेण्यात येणार मेगाब्लॉक रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी दर रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येतो. त्यामुळे प्रवाशांचे हाल होतात. मात्र, गणेशोत्सव सुरु असल्याने आणि रविवार सुट्टीच्या दिवस असल्याने मोठया प्रमाणात नागरिक गणपती पहायला बाहेर पडतात. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय़ घेतला आहे. यामुळे रविवारी,२४ सप्टेंबर रोजी सीएसएमटी-कल्याण मेन लाईन आणि सीएसएमटी-पनवेल हार्बर लाईनसह ट्रान्स-हार्बर लाईनवर कोणताही मेगा ब्लॉक असणार नाही . तसेच पश्चिम रेल्वेवर सुद्धा कोणताही मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही आहे. असे रेल्वेकडून सांगण्यात आले त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आज रेल्वेचा मेगाब्लॉक नाही मुंबईकरांना मोठा दिलासा
