- विकासदर ७.२ टक्क्यांवर
नवी दिल्ली- भारत पुन्हा एकदा जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था बनला आहे.जागतिक पातळीवरील
महागाई,महामारी,बुडणाऱ्या अमेरिकन बॅंका आणि यूक्रेन – रशिया युद्धाचे दुष्परिणाम अशा कठिण परिस्थितीतही भारताचा ऑक्टोबर ते डिसेंबर २०१७ च्या तिमाहीत जीडीपी अर्थात आर्थिक विकासदर ७.२ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा गेल्या ५ तिमाहींतील उच्चांक आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत चीनचा विकास दर अवघा ४.५ आहे.
सांख्यिकी कार्यालयाच्या म्हणजेच सीएसओच्या आकडेवारीनुसार कृषी, मॅन्युफॅक्चरिंग,बांधकाम व काही सेवा क्षेत्रांनी चांगली कामगिरी केली आहे. आर्थिक प्रकरणांचे सचिव सुभाष गर्ग म्हणाले, मॅन्युफॅक्चरिंग व बांधकाम क्षेत्रात तेजीमुळे विकासदर वाढीस चालना मिळाली. सीएसओने दुसऱ्या अग्रिम अंदाजात जुलै ते सप्टेंबर २०१७ च्या तिमाहीतील विकासदराचा आकडा ६.५ टक्के केला.वार्षिक विकासदराचा अंदाजही ६.५ टक्क्यांवरून ६.६ टक्क्यांवर नेण्यात आला आहे.भारतीय कृषी क्षेत्राचा विकास दर सध्या ५.५ टक्क्यांवर पोहचला आहे.भारतीय रिझर्व्ह बँकेनेही यंदा ६.६ टक्के विकासदराचा अंदाज मांडला आहे.
यावर्षी प्रति व्यक्ती उत्पन्नात ८.४ टक्के वाढ होण्याची आशा आहे. सध्याच्या तथ्याच्या आधारे विचार करता उत्पन्न १,२७,२९२ रुपये राहण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी उत्पन्न १,१७,४२७ रुपये होते.सध्याची भारताची अर्थव्यवस्था ३.३ ट्रिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे २७३ लाख कोटी रुपये आहे. पुढील पाच वर्षांत हे प्रमाण ४१३ लाख कोटी होण्याची शक्यता आहे.डिसेंबर तिमाहीत चीनचा विकासदर ६.८ टक्के होता.भारताने डिसेंबर २०२२ मध्ये शेवटच्या तिमाहीत ४.४ टक्के आर्थिक विकास दर साधला होता. सप्टेंबर २०२२ मध्ये हा दर ६.३ इतका होता.