अहमदाबाद- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुजरात जनजाती सुरक्षा मंचाने एक नवी मागणी पुढे केली आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या अंतर्गत आदिवासींना आरक्षण आहे. यातून ख्रिश्चन आणि मुस्लीम आदिवासींना वगळावे, अशी त्यांची मागणी आहे. यामुळे आदिवासी समाजात फूट पडण्याचा
धोका आहे.
ख्रिश्चन व मुस्लीम आदिवासींचे आरक्षण रद्द करावे या मागणीसाठी प्रचार मोहीम सुरू केली आहे. अहमदाबाद शहरातील तीन परिसरातून मोर्चे निघाले. साबरमती नदीच्या किनारी मोर्चेकरी एकत्र आले. दरम्यान, शहरात आलेले बाबा बागेश्वर अर्थात धीरेंद्र शास्त्री यांनी जाहीर केले की, आदिवासींना पुन्हा हिंदुत्त्वाकडे वळवण्यासाठी ते आदिवासी भागांचा दौरा करून तिथे सार्वजनिक सभा घेत हिंदुत्त्वाचा प्रचार करणार आहेत.
‘ख्रिश्चन आदिवासी’आरक्षण रद्द करणार
