फ्लोरिडा : एरोप्लेन, डेस्टिनेशन वेडिंग आणि अंडरवॉटर वेडिंग्सनंतर आता अंतराळात लग्न करण्याची संधीदेखील मिळणार आहे. स्पेस पर्स्पेक्टिव्ह नावाची फ्लोरिडा येथील कार्बन न्यूट्रल बलूनमधून वधूवरांना अंतराळात नेऊन त्यांच्या लग्नाची व्यवस्था करणार आहे. त्यामुळे आता लवकरच श्रीमंतांमध्ये स्पेस वेडिंगचा ट्रेंडही सुरू होऊ शकतो.
फुटबॉलच्या आकाराचा असणारा हा स्पेस बलून समुद्रसपाटीपासून १००,००० फूट (१९ मैल) वर तरंगत असेल. याबाबत स्पेस पर्स्पेक्टिव्हचे सह-संस्थापक जेन पॉयन्टर यांनी सांगितले की, अंतराळात जाणाऱ्या या बलूनमध्ये नेपच्यून कॅप्सूल आहे. ती इतर स्पेस टूरपेक्षा सुरक्षित आहे या कॅप्सुलमध्ये बसून अंतराळातून पृथ्वीच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकतात आणि लग्नाची गाठही बांधू शकतात. या प्रकारे अंतराळात लग्न करू इच्छिणाऱ्यांसाठी कंपनीने स्पेस वेडिंगसाठी बुकिंग सुरू केले आहे. मात्र, त्यासाठी २०२४ ची वाट पाहावी लागणार आहे.