- १ रुपया नुकसानभरपाई
देण्याची केली मागणी मुंबई – सध्या तिहार तुरुंगात असलेला अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजन याने ‘स्कूप’ या वेबसिरीजविरोधात गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही मालिका आजपासून ओटीटी प्लॅटफॉर्म ‘नेटफ्लिक्स’ वर प्रदर्शित झाली आहे.
छोटा राजनने म्हटले आहे की “त्यांच्या प्रतिमेचा त्याच्या पूर्व संमतीशिवाय गैरवापर केला जात आहे” जे मानहानी तसेच त्याच्या “वैयक्तिक अधिकारांचे” उल्लंघन आहे. पत्रकार जेडे ऊर्फ ज्योतिर्मय डे यांच्या २०११ मध्ये झालेल्या हत्येवर आधारित ही वेबसीरीज आहे.
छोटा राजनने या मालिकेच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी आणि ट्रेलर काढून टाकावा, अशी मागणी याचिकेत केली. तसेच हंसल मेहता आणि नेटफ्लिक्स एंटरटेनमेंट सर्व्हिसेस इंडियासह मालिकेच्या निर्मात्यांना छोटा राजनच्या वैयक्तिक अधिकारांचे उल्लंघन करण्यापासून रोखण्यासाठी मनाई आदेशाची मागणी केली. तसेच त्याने त्याला १ रुपया भरपाईची मागणी करत मालिकेच्या ट्रेलरच्या टेलिकास्टद्वारे निर्मात्यांनी कमावलेली रक्कम “सार्वजनिक हितासाठी किंवा समाजाच्या उन्नतीसाठी” जमा करण्याची मागणी केली आहे.