नवी दिल्ली –
दिल्लीत आयोजित केलेल्या जी-२० शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर मायदेशी परतताना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या शिष्टमंडळाला एक दिवस आणखी दिल्लीतच थांबावे लागले.
जस्टिन ट्रूडो आणि त्यांचे शिष्टमंडळ विमानाने रविवारी रात्री ८ वाजता दिल्ली विमानतळाहून कॅनडाला रवाना होणार होते. मात्र तांत्रिक बिघाडामुळे विमानाला उड्डाण करता आले नाही. दुरुस्ती करण्यास वेळ लागणार असल्यामुळे जस्टिन ट्रूडो यांनी आणखी एक दिवस दिल्लीत राहण्याचा निर्णय घेतला. कॅनडाच्या सुरक्षारक्षकांनी सांगितले की, विमानात झालेला बिघाड एका रात्रीत दुरुस्त होणे अशक्य आहे. हे विमान दुरुस्त करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.
जस्टिन ट्रूडो यांच्या विमानात तांत्रिक बिघाड
