दक्षिण कोरियात पुराचा कहर! २२ जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

सेऊल – दक्षिण कोरियामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे हजारो लोकांना बेघर व्हावे लागले आहे. सध्या सरकारी यंत्रणेकडून मदतकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यत आहे.
दक्षिण कोरियात गेले काही दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक भागांत पूर आला आहे. या पुरात आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला असून १४ हून अधिक बेपत्ता आहेत. सुमारे ४७६३ लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
ओसोंग शहरातील भुयारी मार्गात १९ वाहने पाण्यात बुडाली आहेत. उत्तर ग्योंगसांगमध्ये भूस्खलन आणि घरे कोसळून सुमारे १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण चुंगचेंग प्रांतात ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. नॉनसान भागातही भूस्खलनामुळे इमारत कोसळून दोघांचा मृत्यू झाला. सरकारी यंत्रणा झालेल्या नुकसानीची पाहणी करत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सेजोंग शहरात दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला. याव्यतिरिक्त, येओंगजूच्या आग्नेय काउंटी आणि चेओन्गयांगच्या मध्यवर्ती काउंटीमध्ये घर कोसळल्यामुळे तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्याचवेळी, चेओंगजू येथे भूस्खलनामुळे एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. गोसानमधील सुमारे ६,४०० रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top