वेलिंग्टन
न्यूझीलंडमध्ये आज सकाळी जोरदार भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता ७.२ रिश्टर स्केल इतकी होती. भारतीय वेळेनुसार आज सकाळी ६:११ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप न्यूझीलंडच्या करमॅडेक बेटांवर झाला. या भूकंपाचे केंद्र १० किलोमीटर खोलीवर होते. या भूकंपानंतर ६:५३ च्या सुमारास याच ठिकाणी दुसऱ्यांदा भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता ५.४ रिश्टर स्केल होती. याचा केंद्रबिंदू ३९ किलोमीटर खोलीवर होता.
दरम्यान, या भूकंपानंतर न्यूझीलंडला त्सुनामीचा धोका नसल्याचे राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सीने ट्विटद्वारे सांगितले. न्यूझीलंडची करमॅडेक बेटे ही भूकंपप्रवण क्षेत्र आहेत. १६ मार्च रोजी न्यूझीलंडमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. याची तीव्रता ७.० रिश्टर स्केल इतकी होती. हा भूकंप न्यूझीलंडमध्ये चीनच्या स्थानिक वेळेनुसार रात्री ८.५६ च्या सुमारास झाला होता.