मुंबई – भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा व्हायरल झालेला कथित अश्लील व्हिडिओ खराच आहे. हा व्हिडिओ मॉर्फ केलेला नाही, त्याचप्रमाणे व्हिडिओमधील व्यक्ति किरीट सोमय्या हेच आहेत, अशी माहिती असलेला अहवाल या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी वरिष्ठांना दिला आहे.
किरीट सोमय्या यांचा हा आक्षेपार्ह व्हिडीओ एका मराठी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केला होता. त्यांच्या या व्हायरल व्हिडिओचा मुद्दा विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उपस्थित करण्यात आला होता. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट १० कडे सोपवण्यात आला असून त्यांनी तपास सुरू केला आहे. प्राथमिक आधारावर गुन्हे शाखेने संबंधित वृत्तवाहिनीशी संपर्क साधून व्हिडिओची मागणी केली.
तपास यंत्रणेला किरीट सोमय्या यांचा व्हिडिओ मिळाल्यानंतर त्यांनी त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठवला. त्यावेळी तो व्हिडिओ खरा असल्याचे आढळले.आता या वृत्तवाहिनीकडे असलेल्या अन्य व्हिडिओंबाबत विचारणा केल्याचे समजते.
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा ‘तो’ व्हिडीओ खराच
