भिवंडी – भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीने विजय संपादन केला आहे.यामध्ये सभापतीपदी भाजपचे सचिन बाळाराम पाटील तर उपसभापतीपदी शिंदे गटाचे मनेष वसंत म्हात्रे हे विजयी झाले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक सोमवारी बाजार समितीच्या सभागृहात पार पडली.यावेळी सभापती पदाच्या निवडीसाठी महायुतीच्यावतीने भाजपचे सचिन बाळाराम पाटील यांनी अर्ज दाखल केला होता तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीचे महेंद्र पाटील यांनी अर्ज दाखल केला होता.यावेळी सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत सचिन पाटील यांना ९ तर महेंद्र पाटील यांना ८ मते मिळाली असून एक मत बाद झाले. अशाप्रकारे अवघ्या एका मताने सचिन पाटील यांचा विजय झाला.
भिवंडी बाजार समिती सभापतीपदी महायुतीच्या सचिन पाटलांची निवड
