महाराष्ट्रात आजपासून ३१ मे पर्यंतशून्य सावलीचा अनुभव घेता येणार!

नागपूर

शून्य सावलीचा अनुभव दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांना येणार आहे. सूर्य बराेबर डाेक्यावर आणि सावली पायाखाली येणे यालाच शून्य सावली असे म्हणतात. महाराष्ट्रात आजपासून ३१ मे पर्यंत वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या दिवशी शून्य सावलीचा अनुभव येणार आहे. त्यानुसार नागपूर येथे २६ मे राेजी सावली पायाखाली येणार आहे.

सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. कर्कवृत्त आणि मकरवृत्तामध्ये असणाऱ्या सर्व भूभागावर उत्तरायण व दक्षिणायन हाेताना सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो. भारताचा विचार केल्यास अंदमान-निकोबार बेटावर इंदिरा पॉइंट येथे अक्षवृत्तावर ६ एप्रिल आणि ५ सप्टेंबर रोजी दुपारी सूर्य अगदी डोक्यावर असतो आणि शून्य सावली दिवस घडतो. पुढे १० एप्रिल आणि १ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथे शून्य सावली दिवस येतो. तो दक्षिण भारतात तेलंगणा येथे २ मे पर्यंत विविध अक्षवृत्तांवर असलेल्या शहरांत शून्य सावली दिवस पाहता येतो. महाराष्ट्रात ३ मे ते ३१ मे पर्यंत शून्य सावली दिवस येतात. कोल्हापूरातील सावंतवाडी येथे ३ मे रोजी तर धुळे जिल्ह्यात ३१ मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येतो. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत. त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे. त्यामुळे दुपारी १२ ते १२:३५ या वेळेत नागरिकांनी सूर्य निरीक्षण करावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top