जेजुरी:
जेजुरीच्या खंडेरायाचे गडकोट, मंदिर आवार यांचे नियोजन तसेच व्यवस्थापन पाहणाऱ्या मार्तंड देवसंस्थान समितीवर मागील आठवड्यात सात विश्वस्तांच्या निवडी झाल्या आहेत. मात्र या निवडीत सामाजिक कार्यकर्त्यांना बाजूला करुन बाहेरील सहाजणांची निवड केल्यामुळे जेजुरी शहरात नाराजीचा सूर आहे.
माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत घेऊन यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, ‘जेजुरी देवसंस्थानच्या सात विश्वस्तांपैकी 5 ते 6 विश्वस्त हे राजकीय पक्षाशी निगडीत असून ते बाहेरील रहिवासी आहेत. निवडीमध्ये एकच विश्वस्त स्थानिक निवडला असून जेजुरीतील नित्य वारकरी, सेवेकरी, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासू व्यक्तींना राजकीय हस्तक्षेप होत डावलले गेले आहे. ही बाब ग्रामस्थांसाठी दुर्दैवी आहे. या निवड प्रक्रियेचा निषेध करतो, याबाबत येत्या दोन दिवसांत मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिरात ग्रामस्थ बैठकीचे आयोजन करून उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत.’