सचिन तेंडूलकरचा बंगलाआता पाच मजली होणार

मुंबई – भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा वांद्रे येथे तीन मजली बंगला आहे. या बंगल्याला पाच मजली करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी सचिन तेंडुलकर यांची मागणी होती. हा बंगला महापालिका आणि सागरी क्षेत्र व्यवस्थापनाच्या अंतर्गत येतो. त्यामुळे त्यांची परवानगी पाच मजली इमारत करण्यासाठी आवश्यक होती. त्यासाठी सचिन यांनी अर्ज केला होता. काही अटी आणि शर्टी ठेवून तीन मजली बंगला पाच मजली करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकर यांचे स्वप्न साकार होणार असे म्हटले जात आहे.

या बंगल्याच्या जागी आधी दोराब व्हिला हा बंगला होता. वांद्रे पश्चिममधील पेरी क्रॉस रोडवरील या बंगल्याच्या जागी तेंडुलकर यांनी बंगला बांधला. सहा हजार चौरस फूट जागेत तळमजला अधिक साडेतीन माळ्यांचे बांधकाम तेंडुलकर यांनी आधीपासूनच केले आहे. २००७ मध्ये त्याची मंजुरी दिली होती. पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दराडे यांनी सांगितले की, नियमात राहूनच वाढीव बांधकाम करावे लागेल. बांधकाम करताना तयार होणारा मलबा सीआरझेड क्षेत्रात टाकता येणार नाही. २०१९ मध्ये नियमात बदल होऊन ०.५ इतका वाढीव फ्लोअर स्पेस इंडेक्स देण्यात आला. त्या आधारे तेंडुलकर व पत्नी डॉ. अंजली यांनी महापालिका आणि सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडे अर्ज केला होता. त्याला आता मंजुरी मिळाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top