संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 02 December 2022

दिनविशेष! सायकलांचा छंद असलेले पुण्यातील संग्राहक विक्रम पेंडसे यांचा वाढदिवस

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुण्यातील संग्राहक विक्रम पेंडसे यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म ६ जून १९६६ रोजी झाला. विक्रम पेंडसे यांना लहानपणापासूनच सायकल व मोटरसायकलीचे अप्रूप होते. वाणिज्य शाखेकडील पदवीधर असलेले विक्रम पेंडसे १९९० पासून दुरुस्तीच्या व्यवसायात होते. काही वर्षांपूर्वी दुसऱ्या महायुद्धात वापरली गेलेली BSA Paratrooper ही सायकल हाती आल्यानंतर सुरु झालेली ही वाटचाल आज एका संग्रहालयात परिवर्तित झालेली आहे.

जीर्ण अवस्थेत असणाऱ्या अनेक सायकली मूळ रुपात परत आणण्यासाठी विक्रम यांना साथ मिळाली ती पांडुरंग गायकवाड यांची. गायकवाड हे सुद्धा सायकलप्रेमी आणि सायकलपटू. गायकवाडांनी दक्षिण आशियाई सायकलींग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. गायकवाडांच्या अथक प्रयत्नातून या संग्रहातील प्रत्येक सायकल आजही चालत्या अवस्थेत आहे. सायकली जमवता जमवता विक्रम यांच्या संग्रहात लहान मुलांच्या तीन चाकी सायकल, सायकलींचे विविध सुट्टे भाग, पेडल कार्स, कुलूपे, घड्याळे, रेडिओ, ग्रामोफोन, रेकॉर्ड प्लेअर, टाईप रायटर, टेलिफोन, विविध आकारांच्या आणि रंगाच्या काचेच्या बाटल्या, अडकित्ते आणि पानाचे डबे जुनी वजने व मापे आणि अनेक घरगुती वस्तू यांचादेखील समावेश झाला आहे. हा संग्रह सर्वांसाठी खुला असावा या हेतूने पुण्यातल्या कर्वेनगरमध्ये विक्रम पेंडसे यांनी सायकलींचं एक आगळं संग्रहालय सुरू केलं आहे.
या संग्रहालयाच्या तिसऱ्या मजल्यावर त्यांनी एका जुन्या सायकलच्या दुकानाची प्रतिकृती उभारली आहे. सायकल विषयीचा सेट अप त्यात पाहायला मिळतो अनेक ठिकाण हून जमविले सायकलसंग्रह पाहून थक्क व्हायला होते. येथील जुन्या पुण्याची छायाचित्रेही आपल्याला आकर्षित करतात. असे हे छंदातून उभे राहिलेले हे संग्रहालय आपल्याला सायकलच्या रम्य आठवणींची सफर घडवते.
विक्रम पेंडसे यांची Web site.
https://www.vikrampendsecycles.in
संग्रहालयाची वेळ -११ ते ७ (पूर्वनियोजित वेळेनुसार) मंगळवारी बंद (शासकीय सुट्यांच्या दिवशी चालु)
पत्ता-२२.हर्ष सहवास सोसायटी, कर्वेनगर, पुणे ५२
फोन नंबर. ८५३०४१८५९७ तिकीट-आहे.

संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami