संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

यशवंत जाधवांच्या घरातून २ कोटी रुपये जप्त, १० बँक लॅाकर्स सील; सोमय्यांचे टि्वट

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – शिवसेनेचे नेते आणि मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घराची तपासणी आज तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुरु आहे. ३६ तासांहून अधिक कालावधी या धाडसत्राला झाला आहे. आयकर विभागाने जाधव यांच्या घरातून दोन कोटी रुपये जप्त केले आहे. त्याचे दहा बँक खात्यातील लॅाकर्स जप्त करण्यात आले आहे. अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी यांनी टि्वट करुन ही माहिती दिली. आज तिसऱ्या दिवशी आयकर विभागाचे अधिकारी जाधव यांची कसून चैाकशी करीत आहेत.

यशवंत जाधव यांच्या घरी शुक्रवारी सकाळी सात वाजता आयकर विभागाने छापा टाकला होता. तेव्हापासून सुमारे ३६ तासाहून अधिक काळ यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नीची चौकशी सुरू आहे. मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी कोलकाता येथील शेल कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार केल्याचं आयकर विभागाच्या यापूर्वीच्या तपासात समोर आलं असल्याची माहिती आहे. यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शेल कंपन्यांबरोबरच्या व्यवहारातून पैसे कमवल्याचा आरोप आयकर विभागाने केला आहे.

प्रधान डीलर्स नावाच्या कंपनीकडून यामिनी जाधव यांनी 1 कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याचा निवडणूक प्रतिज्ञापत्रात उल्लेख आहे. मात्र तपासात ही शेल कंपनी असल्याचं उघड झाले आहे. यामिनी जाधव यांनी कर्ज घेतल्याचं दाखवलेलं आहे, पण हा पैसा कर्जाचा नाही तर त्यांचाच असल्याचं आयकर विभागाचं म्हणणं आहे. आयकर विभाग एका हवाला एजंटचा तपास करत असताना त्यांच्या मार्फत 15 कोटी रूपये काही रोख रक्कम आणि चेक स्वरूपात जाधव कुटूंबियांकडे आल्याचे दिसून आले. या उत्पन्नाची माहिती ही जाधव कुटूंबियांनी लपवली आणि त्यावर कर चुकवला नाही असा आयकर विभागाला संशय आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami