संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 07 December 2022

येस बँक १० टक्के स्टेक विकण्याच्या तयारीत

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

येस बँक १० टक्के स्टेक विकण्याचा विचार करत आहे. या बँकेत प्रायव्हेट इक्विटी ग्रुप कार्लाइल पीअर अॅडव्हेंट इंटरनॅशनल ३७५० ते ४५०० कोटी गुंतवणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. तसेच, ही बँणक भारतीय स्टेट बँकेच्या अधिपत्याखाली आल्यास बँकेची बॅलन्सशीट अधिक मजबूत होईल असं वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिलं आहे.

क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल प्लेसमेंट आणि विदेशी चलन परिवर्तनीय बाँडद्वारे 10,000 कोटी रुपये उभारण्याच्या प्रस्तावाला येस बँकेच्या बोर्डाने 21 जानेवारी 2021 रोजी मंजुरी दिली. या मंजुरीची मुदत 22 फेब्रुवारी 2022 रोजी संपणार होती. येस बँकेला गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात अद्याप यश आलेलं नाही. त्यामुळे डिसेंबरच्या अखेरिस बोर्डाने इक्विटी, बाँड्स, वॉरंट्स किंवा इतर कोणत्याही इक्विटी लिंक्ड सिक्युरिटीच्या स्वरूपात भांडवल उभारण्याच्या पूर्वीच्या प्रस्तावाच्या विस्तारास मान्यता दिली.

शेअर बाजारात घसरण सुरू असतानाही गुरुवारी येस बँकेच्या शेअरमध्ये 0.78 टक्क्यांची किरकोळ वाढ दिसून आली. परंतु शुक्रवारी मात्र कामकाजादरम्यान शेअरमध्ये मोठी घसरण झाली. बँकमध्ये प्रेफरन्शिअल अलॉटमेंटच्या माध्यमातून खासगी इक्विटी गुंतवणूकदारांद्वारे यात गुंतवणूक केली जाऊ शकते. 2017 मध्ये बॅन कॅपिटलनं अॅक्सिस बँकेत अशीच गुंतवणूक केली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami