शाहरुख खानचा ‘डंकी’ हा चित्रपट २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.आपला हा चित्रपट हिट व्हावा, यासाठी आज सकाळी वैष्णोदेवीच्या दरबारात त्याने दर्शन घेतले. शाहरुखचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यावेळी शाहरुख खान डार्क चष्मा आणि त्याच रंगाच्या हुडी जॅकेटमध्ये दिसला. त्याने आपला चेहर लपवला होता. सुरक्षा रक्षकांनी त्याला घेरले होते.
पीटीआयने आपल्या अधिकृत X हँडलवर शाहरुखचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेयर करत त्यांनी लिहिले की, “बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने आज माता वैष्णो देवी मंदिराला भेट दिली.”
वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाण्याची शाहरुखची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी पठाण’ आणि ‘जवान’ रिलीज होण्यापूर्वी शाहरुख माँ वैष्णो देवीच्या दरबारात गेला होता. हे दोन्ही सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले होते.