ठाणे
सिद्धेश्वर जलकुंभाच्या मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह बदलण्याचे काम ठाणे महापालिकेने हाती घेतले आहे. यामुळे गुरुवारी सकाळी 9 ते रात्री 9 या कालावधीत शहराच्या काही भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
सिध्देश्वर जलकुंभाच्या जलवाहिनीवरील 500 मिमी व्यासाचा व्हॉल्व्ह बदलण्यात येणार आहे. गुरुवारी 14 डिसेंबर रोजी हे काम हाती घेतले जाणार आहे. या कामामुळे जलकुंभावरून होणारा पाणी पुरवठा सकाळी 9 ते रात्री 9 या कालावधीत बंद राहणार आहे. त्यामध्ये सिध्देश्वर जलकुंभ, इटरनिटी जलकुंभ, जॉन्सन जलकुंभ, समता नगर जलकुंभ, दोस्ती जलकुंभ, म्हाडा जलकुंभ, विवियाना मॉल व आकृती जलकुंभ भागांचा सामावेश आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल अशी माहिती ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली.