जळगाव
जळगाव शहरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) सेक्टर डीमधील मोरया केमिकल कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे कंपनीला आग लागली. ही घटना आज सकाळी ९ च्या सुमारास घडली. या भीषण आगीत २० पेक्षा अधिक कर्मचारी गंभीर जखमी झाले. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते. या घटनेची माहिती मिळताच औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाच्या ३ ते ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीत सकाळ पाळीतील २० कर्मचारी गंभीररीत्या भाजले. त्यांना तातडीने तीन रुग्णवाहिकांतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, स्फोटाचे कारण अद्याप कळलेले नाही.